Contact Us
Adhyatma Sahitya Vikas Sanstha,
63 Jaswant Sarai,
Jodhpur, Rajasthan
342001
Tel: +91 9460228300
Copyright © 2025. All Rights Reserved.
विठ्ठल
युर्गे अट्ठावीस विटेवरी उभा।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।।
पुंडलिकाचे भेर्टी परब्रह्म आलेंगा।
चरणी वाहे भीमा उद्वरी जगा || 1 ||
जय देव जय देव जय पांडुरंगा।
रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभां पावे जिवलगा ।। ध्रू. ।।
तुळसीमाळा गळां कर ठेवुनि कटी।
कासे पीताम्बर कस्तुरि लल्लाटीं।।
देवसुरवर नित्य येति भेटी।
गरूड हनुमंत पुढे उभे राहती ।। जयदेव. || 2 ||
आषाढ़ी कार्तिकी भक्जन येती।
चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती।
दर्शन-हेळा मात्रै तयां होय मुक्ति।
केशवासि नामदेव भावें ओवाळिती ।। जय देव. ।। 3 ।।
मारुति स्तोत्र
भीमरूपी महारूद्रा, वज्र हनुमान मारूती।
वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना । ।। ।।
महाबली प्राणदाता, सकळां उठवी बळें।
सौख्यकारी शोकहर्ता, धूर्त वैष्णव गायका ।।2।।
दीननाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा।
पातालदेवताहंता, भव्य सिंदूरलेपना लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना।
पुण्यवंता पुण्यशीळा, पावना परितोषका ।।4।।
ध्वजांगे उचली बाहो, आवश लोटला पुढें।
काळाग्नि काळरूद्राग्नि, देखतां कांपती भयें। ।5।।
ब्रह्मांडे माइलों नेणां, आंवाळें दंतपंगती।
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भ्रकुटी ताठिल्या बळें । ।6।।
पुच्छ तें मुर्डिळे माथां, किरीटी कुंडलें बरी।
सुवर्ण कटि कांसोटी, घंटा किंकिर्णि नागरा । ।7।।
ठकोरे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू।
चपलांग पाहतां मोठे, महा विद्युल्लतेपरी ।।8।।
कोटिच्चा कोटि उड्डाणें, झेंपावे उत्तरेकड़े।
मद्राद्री सारखा द्रोणू, क्रोधें उत्पाटिला बळें। 1917
आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती।
मनासी टाकिलें मागे, गतीसी तुळणा नसे ।।10।।
अणुपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जात से।
तयासी तुळणा कोठे, मेरूमंदार धाकुटे । ।11।।
ब्रह्मण्डाभोंवते वेढे, वज्रपुच्छे करूं शके।
तयासी तुळणा कैची, ब्रह्माण्डर्डी पाहतां नसे ।।12।।
आरक्त देखिलें डोळां, ग्रासिलें सूर्यमंडला।
बाढतां वाढतां बाढे, भेदिलें शून्यमण्डला ।।13।।
धन धान्य-पशुवृद्धि, पुत्र पौत्र समस्तही।
पावती रूपविद्यादि, स्तोत्रपाठें करूनियां । ।14।।
भूतप्रेत समंधादि, रोग व्याधि समस्तही।
नासती तूटतीचिंता, आनंदे भीमदर्शनें ।।15।।
हे धरा पंधराश्लोकी, लाभली शोभली बरी।
दृढ़देहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळां गुणें । ।16 ।।
रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू ।
रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ।।17 ।।
॥ श्री ॥
प.पू. माताजी की आरती
आरती मातेश्री दाते ।
सद्गुरु आत्मज्योतिरुपा ।
भक्ति ज्ञान वैराग्य ।
परिपूर्ण अंतरंगा ।
आरती मातेश्री दाते ॥ ९ ॥
अखंड नाम निजध्यान ।
पापपुण्यातीता ।
रामराया कृपा अन्तर्निष्ठा ।
स्वानन्द मायातीता ।
आरती मातेश्री दाते ॥२ ॥
करुणा करो मोक्षश्रेयोरुपा ।
भक्ति भाव देओ माता ।
हृदयानंद वर्धिनी ।
संतरुप ब्रह्मसुता ।
आरती मातेश्री दाते ॥ ३ ॥
गुरुराया रे गुरुराया रे गुरुराया रे गुरुराया शिवराया रे शिवराया रे शिवराया रे शिवराया
धन्य सद्गुरू राय रेधन्य सद्गुरू माय रेधन्य वासुदेव रेधन्य दत्त अवतार रे
जरीदेव चरणी चित्त न जड़लेजन्म नी केले काय रेगुरुराया रे गुरुराया रे, गुरुराया रे गुरुराया
शिवराया रे शिवराया रे, शिवराया रे शिवरायापूर्णानन्द गुरुराज दयाघन स्वामीराय महाराज
पूर्णानन्द गुरुराज दयाघन वासुदेव महाराजपूर्णानन्द गुरुराज दयाघन भाऊ साहेब महाराज
पूर्णानन्द गुरुराज दयाघन अम्बुराव महाराजपूर्णानन्द गुरुराज दयाघन रामराय महाराज
पूर्णानन्द गुरुराज दयाघन दाते साहेब महाराजपूर्णानन्द गुरुराज दयाघन मातेश्वरी महाराज
श्रीहरि हरिबारा अभंगजन्माचें तें मूळ पाहिलें शोधून।दुःखासी कारण जन्म ध्यावा ।।1।।
पापपुण्य करूनी जन्मा येतो प्राणी ।नरदेहा येउनि हानि केली ।12।।
रजतमसत्त्व आहे ज्याचे अंगीं।याच गुणें जगीवायां गेला ।।3।।
तम म्हणजे काय नरकचि केवळ ।रज तो सबळ मायाजाल ।।4।।
तुका म्हणे येथें सत्त्वाचें सामर्थ्य।करावा परमार्थ अहर्निशीं ।।5।।
(2)
अहर्निशीं सदा परमार्थ करावा।पाय न ठेवावा आडमार्गी ।।1।।
आडमार्गी कोणी जन जे जातील ।तयांतुनी काढीलतोचि ज्ञानी ।।2।।
तोचि ज्ञानी खरा तारीं दुजियांसि । वेळोवेळां त्यासीं शरण जावें ।।3।।
आपण तरेल नव्हे तें नवल ।कुळें उद्धरील सर्वाचीं तो ।।4 ||
शरण गेलियाने काय होते फळ।तुका म्हणे कुळ उद्धरिलें ।।5।।
(3)
उद्धरिळे कुळ आपण तरला। तोचि एक झाला त्रैलोक्यांत ।।1।।
त्रैलोक्यांत झालें द्वैतचि निमालें।ऐसे साधियेलें साधन बरवें। 2।।
बरवें साधन सुख शांती मना।क्रोध नाहीं जाणा तिळभरी।।3।।
तिळभरी नाहीं चितासी तो मळ ।तुका म्हणे जळ गंगेचे तें ।।4।
(4)
जैसी गंगा वाहे तैसे त्याचें मन।भगवंत जाणा त्याचे जवळी।।1।।
त्याचे जवळी देव भक्तिभावें उभा।स्वानंदाचा गाभा तया दिसे ।।2।।
तया दिसे रूप अंगुष्ठप्रमाण।अनुभवी खूण जाणती हे।।3।।
जाणती हे खूण स्वात्मानुभवी ।तुका म्हणे पदवी ज्याची त्याला ।।4।।
(5)
ज्याची त्याला पदवी इतरां न साजे। संताला उमजे आत्मसुख ।।1।।
आत्मसुख ध्या रे उघड़ा ज्ञानदृष्टी। याविण चावटी करूं नका ।।2।।
करूं नका कांही सतसंग धरा। पूर्वीचा तो दोरा उगवेल ।।३।।
उगवेल प्रारब्ध संतसंगे करूनी । प्रत्यक्ष पुराणी वर्णियेले ।।4।।
वर्णियेले एका गुणनामघोषें। जातील रे दोष तुका म्हणें ।।5।।
(6)
दोष रे जातील अनंत जन्मींचे। पाय त्या देवाचे न सोडावे ।।1।।
न सोडावे पाय निश्चय तो करा। आळवा शारंगधरा भावबळें । ।2।।
धरूनि केशव आणा भाव बळें। पापियां न कळे कांही केल्या ।।3।।
न कळे तो देव संतसंगावांचुनी। वासना जाळोनि शुद्धकरा ।।4।।
शुद्ध करा मन देहातीत व्हावें। वस्तुसी ओळखावें तुका म्हणे ।।5।।
(7)
ओळखा रे वस्तु सांडा रे कल्पना । नका आडराना जाऊं झीं।।1।।
झीं जाल कोठे बुडवाल हिंत। विचारी मनांत आपुलिया ।।2।।
आपुलिया जीवें शिवासि पहावें। आत्मसुख ध्यावें वेळोवेळां ।।३।।
ध्यावें आत्मसुख स्वरुर्पी मिळावें । भूर्ती लीन व्हावें तुका म्हणे ।।4।।
(8)
भूतीं लीन व्हावें सांगावे नलगेचि। आतां अहंकाराची शांति करा ।।1।।
शांति करा तुम्हीं ममता नसावी । अन्तरी वसावी भूतदया ।।2।।
भूतदया ठेवा मग काय उणें। प्रथम साधन हेंचि असो ।।3।।
असो हे साधन ज्याचे चित्तीं वसे । मायाजाळ नासे तुका म्हणे ।।4।।
(9)
मायाजाळ नासे या नामेंकरूनि । प्रीति चक्रपाणी असों द्यावी ।।1।।
असो द्यावी प्रीती साधू’चे पायांसी । कदा कीर्तनासी सोडूं नये ।।2।।
सोडू’ नये पुराणश्रवण कीर्तन। मनन निदिध्यास साक्षात्कार ।।३।।
साक्षात्कार झालिया सहज समाधि। तुका म्हणे उपाधि गेली त्याची ।।4।।
(10)
गेली त्याची जाणा ब्रह्म तोचि झाला। अंतरी निवाला पूर्णपणें ।।1।।
पूर्णपणें धाला राहतो कैशा रीतीत्याची आतां स्थिती सांगतों मी ।।2।।
सांगतो मी तुम्हां ऐका मनोगत। राहतो मूर्खवत जगामांजी ।।3।।
जंगात पिशाच्च अंतरी शहाणा। सदा ब्रह्मीं जाणा निमग्न तो ।।4।।
निमग्न तो सदा जैसा मकरंद । अंतर्बाह्य भेद वेगळाले ।।5।।
वेगळाले भेद किती त्या असती। हृद्गत त्याची गती न कळे कवणा ।।6।।
न कळे कवणाला त्याचे हेचि वर्म। योगी जाणें वर्म खूण तयाची ।।7।
खूण त्याची जाणे जे तैसे असती। तुका म्हणे भ्रांती दुजियाला ।।8।।
(11)
दुजियाला भ्रांती भाविकाला शांती। साधूंची ती वृत्ति लीन झाली । ।1।।
लीन झाली वृत्ति ब्रह्मातें मिळाले। जळांत आटलें लवण जैसे ।।2।।
लवण जैसे पुन्हां जळाचें बाहेरी। येता नाहीं खरें त्यांतूनीया ।।३।।
त्यासारिखे तुम्हीं जाणा साधुवृत्ति। पुन्हां न मिळती मायाजाळीं ।।4।।
मायाजाळ त्यांना पुन्हां रे बाधेना। सत्य सत्य जाणा तुका म्हणे ।।5।।
(12)
स्वर्गलोकींहूनि आले हे अभंग। धाडियेले सांग तुम्हांलागी ।।1।।
नित्यनेमें यांसी पढतां प्रतापें।जळतील पापे जन्मांतरींची। ।2।।
तया मागें पुढें रक्षी नारायण। मांडिल्या निर्वाण उड़ी घाली ।।३।।
बुद्धीचा पालट नासेल कुमति। होईल सद्भक्ति येणें पंथे । ।4।।
सद्भक्ति झालिया सहज साक्षात्कार । होईल उद्धार पूर्वजांचा ।।5।।
साधतील येणें इह परलोक। सत्य सत्य भाक माझी तुम्हां ।।6।।
परोपकारासाठीं सांगितले देवा। प्रासादिक मेवा ग्रहण करा ।।7।।
येणें भवव्यथा जाईल तुमची ।। सख्या विठ्ठलाची आण मज । ।8।।
टाळ आणि कंथा धाडिली निशाणी। ध्यारे ओळखोनी सज्जन हो।।9।।
माझे दंडवत तुम्हां सर्व लोकां। देहासहित तुका वेकुंठासी ।।10।।
(13)
सत्य सत्य जाणा त्रिवाचा नेम हा। अनुभव पाहा पदोपदीं । ।। ।।
पदोपर्दी पाहा श्रीमुख चांगले। प्रत्यक्ष पाऊलें विठोबाचीं ।।2।।
विठोबाचे भेटी हरेल बा चिंता। तुम्हांलागीं आतां सांगितलें । ।3।।
सांगितले खरें विश्वाचिया हिता। अभंग वाचिती जे कां नर ।।4।।
ते नर पठणी जीवन्मुक्त झाले। पुन्हां नाहीं आले संसारासी ।।5।।
संसार उडाला संदेह फिटला। पूर्ण तोचि झाला तुका म्हणे ।।6।।
(14)
चार कोटि एक लक्षाचा शेवट। चौतीस सहस्र स्पष्ट सांगतिले ।।1।।
सांगितले तुका कथोनियां गेला। बारा अभंगाला सोडूं नका ।।2।।
सोडू नका तुम्हा सागिंतले वर्म। भवपाशीं कर्मे चुकतील ।।३।।
चुकती यातायाती विठोबाची आण। करा हैं पठण जीवे भावें ।।4।।
जीवेंभावे करितां होईल दर्शन। प्रत्यक्ष सगुण तुका म्हणे ।।5।।
(15)
वेदाचे अभंग केले श्रुतिपर । द्वादश सहस्र संहितेचे ।।1।।
निघंट निरूक्त आणि ब्रह्मसूत्र । अवतार सहस्र उपग्रंथ।।2।।
अभंग हे कोटी भक्तिपर झाले। ज्ञानपर केले तितुकेचि । ।3।।
पंचाहतर लक्ष वैराग्य वर्णिले। नाम तें गाईलें तितुकेचि ।।4।।
साठ लक्ष केला बोध या जगासी। वर्णिलें रूपार्सी तितुकेंचि ।।5।।
तीस लक्ष केली देवासि करूणा। कर्मकाण्ड जाणा एक लक्ष ।।6।।
द्वादशसहस्र स्वात्मानुभवी एवं जाणा सर्व संख्या ऐशी ।।7।।
ऐसे हे अभंग झाले से भूतीं। पांच अंतराळी पत्रिकेचे । ।8।।
चौतीस सहस्र लक्ष एक कोटि पांच। साँगोनिया साच गेला तुका ।।9।।
(16)
सगुण हें ब्रह्म विठ्ठलचि बोले। ऐक पां वहिले तुकारामा ।।1।।
तुकाराम तुवां केले जे अभंग।करिती जे कां जगीं नित्य पाठ ।।2।।
जगीं पाठ करितां आवडर्डी सद्भावें। विपत्ति न होये त्या प्राण्यासी ।।३।।
प्राण्याचे कल्याण होईल बा पाहे। भावें वाचितां हे नित्यनेमें ।।4।।
नेमे संकष्टासी करी अकरा पाठ। विध्न त्याचे स्पष्ट दूर होय । ।5।।
दूर होय विघ्न विठ्ठल म्हणें तुकया। शेवटी निजठायां नेईन मी ।।6।।
(17)
गुरूचरणी ठेविति भाव। आपेआप भेटे देव ।।1।।
म्हणुनी गुरूसी भजावें। रूप ध्यानासी आणावें ।।2।।
देव गुरूपार्शी आहे। बारंबार सांगू काये ।।३।।
तुका म्हणे गुरूभजनी। देव भेटे जनीं वनी ।।4।।
(18)
जयजय गुरूमहाराज गुरू (4 वेळा)जय जय परब्रह्म सद्गुरू (1 वेळा)
गुरू जयगुरू ज जयगुरू ।। जयगुरू जयगुरुजयगुरू जर जयगुरू जयगुरू जयगुरू ।।
(19)
सब संतन की जय । बालगोपाल की जय ।
तुकाराम महाराज की जय। ज्ञानोबा महाराज की जय।
रुक्मांगदमहाराज की जय। कृष्णद्वेपायन महाराज की जय ।
रामदास महाराज की जय। गुरूलिंग जंगम महाराज की जय।
रघुनाथ प्रियमहाराज की जय।
श्री भाऊसाहेब महाराज की जय ।
श्री अंबुरावमहाराज की जय ।
श्री गुरूदेव रामभाऊ महाराज की जय ।
श्री गुरुदेव दाते साहेब महाराज की जय ।
श्री मातेश्वरी महाराज की जय।
श्री गुरूदेव दत्त दत्त दत्त ।
(20)
रामाश्रम सद्गुरूराज । गुरुलिंग जंगम महाराज ।। (2 वेळ) गुरूलिंग जंगम महाराज ।। (2 वेळ)
रामाश्रम सद्गुरुराज । गुरुलिंगजंगम महाराज ।।
(2 वेळ) हिंचगेरीवासी सद्गुरुराज । उमदी भाऊसाहेब महाराज ।।
(2 वेळ) उमदी भाऊसाहेब महाराज ।। (2 वेळ) हिंचगेरीवासी सद्गुरुराज ।
उमदी भाऊसाहेब महा राज ।। (2 वेळ) हिंचगेरीवासी सद्गुरुराज । जिग-जीवणी
अंबुराव महाराज (2 वेळ) जिगजीवणी अंबुरावमहाराज ।। (2 वेळ)
हिंचगेरीवासी सद्गुरुराज । जिगजीवणी अंबुराव महाराज ।। (2 वेळ) निंबाळवासी सद्गुरुराज।
गुरूदेव रामभाऊ महाराज ।। (2वेळ) गुरूदेव रामभाऊ महाराज ।। (2 वेळ)
निंबाळवासी सद्गुरुराज । गुरूदेव रामभाऊमहाराज ।। (2 वेळ)
जोधपुवासी सद्गुरू राज। दाते साहेब महाराज (2 वेळ) दाते साहेब महाराज (2 वेळ) जोधपुर वासी सद्गुरुराज ।
दाते साहेब महाराज ।। (2 वेळ) जोधपुरवासी सद्गुरूमाय। मातेश्वरी महाराज (2 वेळ)
मातेश्वरी महाराज (2 वेळ) जोधपुरवासी सद्गुरूमाय। मातेश्वरी महाराज (4 वेळ)
(21)
आकल्प आयुष्य व्हावें तया कुळा। माझिया सकळां हरिच्या दासां ।।1।।
कल्पनेची बाधा न हो कोणे काळी। ही संतमंडळी सुखी असो ।।2।।
अहंकाराचा वारा न लागो राजसा। माझ्या विष्णुदासा भाविकांसी ।।३।।
शरीरप्राणांसी करीन कुरवंडी क्षण एक न सोडी संग त्यांचा ।।4।।
नामा म्हणे तया असावें कल्याण। जया मुखीं निधान पांडुरंग ।।5।।
विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ।
(22)
मी तंव अन्यायी अपराधी। कर्महीन मतिमंदबुद्धि ।।1।।
तुज म्यां आठविलें नाहीं कीं। वाचे कृपानिधि माय बापा।।2।।
नाहीं ऐकिलें गाइलें गीत। धरिली लाज सांडिले हित ।।३।।
नावडे पुराण बैसले संत। केली बहुत परनिंदा ।।4।।
केला नाहीं करविला नाहीं परोपकार। नाहीं दया आली पीडितां पर ।।5।। करूं
नये तो केला व्यापार। उत्तरी पार तुका म्हणे ।।6।।
ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम !
(23)
अहो बोलिलें लेकरूं। वेडेंवाकुडें उत्तरुं ।।1।।
क्षमा करा अपराध । महाराज तुम्ही सिद्ध ।। ध्रू. ।।
अहो नाहीं विचारिला । अधिकार म्यां आपुला।।2।।
तुका म्हणें ज्ञानेश्वरा। राखा पाया पैं किंकरा ।।3।।
(24)
पाहे प्रसादाची वाट। द्यावें धुवोनियां ताट ।।1।।
शेष घेउनी जाईन । तुमचें झालियां भोजन ।।2।।
अहो झालों एकसवा। तुम्हां आड न ये देवा।।3।।
तुका म्हणे चित्त । करूनि राहिलों निवांत ।।4।।
विडा
विडा ध्या हो नारायण । कृष्ण जगज्जीवना ।।
विनविते रखुमाबाई। दासी होईन मी कान्हा ।। ध्रू. ।।
शांति हे नागवेली । पानें घेऊनियां करीं ।।
मीपण जाळुनीयां । चुना लावियेला वरीं ।।1।।
वासना फोडुनियां । चूर्ण केली सुपारी ।।
भावार्थकापुरानें। धोळियेली निर्धारी ।। 2।।
विवेक हा कातरंग । रंगी रंगला सुरंग ।।
वैराग्य जायफळ । मिळविलें सकळ ।।३।।
दया ही जायपत्री । क्षमा लवंगा आणिल्या ।।
सुबुद्धि वेलदोडे । शिवरार्मी अर्पियेले ।।4।।
माडी परमेश्वर गुरुध्याना । बिडदिरूवदु भजना ।।
नोडो नी निन्नोळु निजखूना । पूर्णेक्यद ज्ञाना ।।1।।
अपरूपद नरतनुविदु नोडो । सडगरदा पाडो ।।
अपहास्यव माडदे नी कूडो। घनचिन्मय गूडो ।।2।।
अग्नीचक्रद बळियल्लि । एरडु कमलदल्लि ।। प्राज्ञा झगिझगिसुव बेळकल्लि। तिळि निन्नोंळगिल्लि।।3||
मेलिन स्थानद सहस्रारा। गुरुतत्त्वदपुरा ।। पेळलळवलद सुखसारा । शंकर पदविवरा ।। भीमा ।।4।।
गुरुराया रे गुरुराया रे गुरुराया रे गुरुराया शिवराया रे शिवराया रे शिवराया रे शिवराया
धन्य सद्गुरू राय रे धन्य सद्गुरू माय रे धन्य वासुदेव रे धन्य दत्त अवतार रे
जरीदेव चरणी चित्त न जड़ले जन्म नी केले काय रे गुरुराया रे गुरुराया रे, गुरुराया रे गुरुराया
शिवराया रे शिवराया रे, शिवराया रे शिवराया पूर्णानन्द गुरुराज दयाघन स्वामीराय महाराज
पूर्णानन्द गुरुराज दयाघन वासुदेव महाराज पूर्णानन्द गुरुराज दयाघन भाऊ साहेब महाराज
पूर्णानन्द गुरुराज दयाघन अम्बुराव महाराज पूर्णानन्द गुरुराज दयाघन रामराय महाराज
पूर्णानन्द गुरुराज दयाघन दाते साहेब महाराज पूर्णानन्द गुरुराज दयाघन मातेश्वरी महाराज
श्रीहरि हरि बारा अभंग जन्माचें तें मूळ पाहिलें शोधून। दुःखासी कारण जन्म ध्यावा ।।1।।
पापपुण्य करूनी जन्मा येतो प्राणी । नरदेहा येउनि हानि केली ।12।।
रजतमसत्त्व आहे ज्याचे अंगीं। याच गुणें जगीवायां गेला ।।3।।
तम म्हणजे काय नरकचि केवळ । रज तो सबळ मायाजाल ।।4।।
तुका म्हणे येथें सत्त्वाचें सामर्थ्य। करावा परमार्थ अहर्निशीं ।।5।।
(2)
अहर्निशीं सदा परमार्थ करावा। पाय न ठेवावा आडमार्गी ।।1।।
आडमार्गी कोणी जन जे जातील । तयांतुनी काढीलतोचि ज्ञानी ।।2।।
तोचि ज्ञानी खरा तारीं दुजियांसि । वेळोवेळां त्यासीं शरण जावें ।।3।।
आपण तरेल नव्हे तें नवल । कुळें उद्धरील सर्वाचीं तो ।।4 ||
शरण गेलियाने काय होते फळ। तुका म्हणे कुळ उद्धरिलें ।।5।।
उद्धरिळे कुळ आपण तरला। तोचि एक झाला त्रैलोक्यांत ।।1।।
त्रैलोक्यांत झालें द्वैतचि निमालें। ऐसे साधियेलें साधन बरवें। 2।।
बरवें साधन सुख शांती मना। क्रोध नाहीं जाणा तिळभरी।।3।।
तिळभरी नाहीं चितासी तो मळ । तुका म्हणे जळ गंगेचे तें ।।4।
(4)
जैसी गंगा वाहे तैसे त्याचें मन। भगवंत जाणा त्याचे जवळी।।1।।
त्याचे जवळी देव भक्तिभावें उभा। स्वानंदाचा गाभा तया दिसे ।।2।।
तया दिसे रूप अंगुष्ठप्रमाण। अनुभवी खूण जाणती हे।।3।।
जाणती हे खूण स्वात्मानुभवी । तुका म्हणे पदवी ज्याची त्याला ।।4।।
(5)
ज्याची त्याला पदवी इतरां न साजे। संताला उमजे आत्मसुख ।।1।।
आत्मसुख ध्या रे उघड़ा ज्ञानदृष्टी। याविण चावटी करूं नका ।।2।।
करूं नका कांही सतसंग धरा। पूर्वीचा तो दोरा उगवेल ।।३।।
उगवेल प्रारब्ध संतसंगे करूनी । प्रत्यक्ष पुराणी वर्णियेले ।।4।।
वर्णियेले एका गुणनामघोषें। जातील रे दोष तुका म्हणें ।।5।।
(6)
दोष रे जातील अनंत जन्मींचे। पाय त्या देवाचे न सोडावे ।।1।।
न सोडावे पाय निश्चय तो करा। आळवा शारंगधरा भावबळें । ।2।।
धरूनि केशव आणा भाव बळें। पापियां न कळे कांही केल्या ।।3।।
न कळे तो देव संतसंगावांचुनी। वासना जाळोनि शुद्धकरा ।।4।।
शुद्ध करा मन देहातीत व्हावें। वस्तुसी ओळखावें तुका म्हणे ।।5।।
(7)
ओळखा रे वस्तु सांडा रे कल्पना । नका आडराना जाऊं झीं।।1।।
झीं जाल कोठे बुडवाल हिंत। विचारी मनांत आपुलिया ।।2।।
आपुलिया जीवें शिवासि पहावें। आत्मसुख ध्यावें वेळोवेळां ।।३।।
ध्यावें आत्मसुख स्वरुर्पी मिळावें । भूर्ती लीन व्हावें तुका म्हणे ।।4।।
(8)
भूतीं लीन व्हावें सांगावे नलगेचि। आतां अहंकाराची शांति करा ।।1।।
शांति करा तुम्हीं ममता नसावी । अन्तरी वसावी भूतदया ।।2।।
भूतदया ठेवा मग काय उणें। प्रथम साधन हेंचि असो ।।3।।
असो हे साधन ज्याचे चित्तीं वसे । मायाजाळ नासे तुका म्हणे ।।4।।
(9)
मायाजाळ नासे या नामेंकरूनि । प्रीति चक्रपाणी असों द्यावी ।।1।।
असो द्यावी प्रीती साधू’चे पायांसी । कदा कीर्तनासी सोडूं नये ।।2।।
सोडू’ नये पुराणश्रवण कीर्तन। मनन निदिध्यास साक्षात्कार ।।३।।
साक्षात्कार झालिया सहज समाधि। तुका म्हणे उपाधि गेली त्याची ।।4।।
(10)
गेली त्याची जाणा ब्रह्म तोचि झाला। अंतरी निवाला पूर्णपणें ।।1।।
पूर्णपणें धाला राहतो कैशा रीती त्याची आतां स्थिती सांगतों मी ।।2।।
सांगतो मी तुम्हां ऐका मनोगत। राहतो मूर्खवत जगामांजी ।।3।।
जंगात पिशाच्च अंतरी शहाणा। सदा ब्रह्मीं जाणा निमग्न तो ।।4।।
निमग्न तो सदा जैसा मकरंद । अंतर्बाह्य भेद वेगळाले ।।5।।
वेगळाले भेद किती त्या असती। हृद्गत त्याची गती न कळे कवणा ।।6।।
न कळे कवणाला त्याचे हेचि वर्म। योगी जाणें वर्म खूण तयाची ।।7।
खूण त्याची जाणे जे तैसे असती। तुका म्हणे भ्रांती दुजियाला ।।8।।
(11)
दुजियाला भ्रांती भाविकाला शांती। साधूंची ती वृत्ति लीन झाली । ।1।।
लीन झाली वृत्ति ब्रह्मातें मिळाले। जळांत आटलें लवण जैसे ।।2।।
लवण जैसे पुन्हां जळाचें बाहेरी। येता नाहीं खरें त्यांतूनीया ।।३।।
त्यासारिखे तुम्हीं जाणा साधुवृत्ति। पुन्हां न मिळती मायाजाळीं ।।4।।
मायाजाळ त्यांना पुन्हां रे बाधेना। सत्य सत्य जाणा तुका म्हणे ।।5।।
(12)
स्वर्गलोकींहूनि आले हे अभंग। धाडियेले सांग तुम्हांलागी ।।1।।
नित्यनेमें यांसी पढतां प्रतापें। जळतील पापे जन्मांतरींची। ।2।।
तया मागें पुढें रक्षी नारायण। मांडिल्या निर्वाण उड़ी घाली ।।३।।
बुद्धीचा पालट नासेल कुमति। होईल सद्भक्ति येणें पंथे । ।4।।
सद्भक्ति झालिया सहज साक्षात्कार । होईल उद्धार पूर्वजांचा ।।5।।
साधतील येणें इह परलोक। सत्य सत्य भाक माझी तुम्हां ।।6।।
परोपकारासाठीं सांगितले देवा। प्रासादिक मेवा ग्रहण करा ।।7।।
येणें भवव्यथा जाईल तुमची ।। सख्या विठ्ठलाची आण मज । ।8।।
टाळ आणि कंथा धाडिली निशाणी। ध्यारे ओळखोनी सज्जन हो।।9।।
माझे दंडवत तुम्हां सर्व लोकां। देहासहित तुका वेकुंठासी ।।10।।
(13)
सत्य सत्य जाणा त्रिवाचा नेम हा। अनुभव पाहा पदोपदीं । ।। ।।
पदोपर्दी पाहा श्रीमुख चांगले। प्रत्यक्ष पाऊलें विठोबाचीं ।।2।।
विठोबाचे भेटी हरेल बा चिंता। तुम्हांलागीं आतां सांगितलें । ।3।।
सांगितले खरें विश्वाचिया हिता। अभंग वाचिती जे कां नर ।।4।।
ते नर पठणी जीवन्मुक्त झाले। पुन्हां नाहीं आले संसारासी ।।5।।
संसार उडाला संदेह फिटला। पूर्ण तोचि झाला तुका म्हणे ।।6।।
(14)
चार कोटि एक लक्षाचा शेवट। चौतीस सहस्र स्पष्ट सांगतिले ।।1।।
सांगितले तुका कथोनियां गेला। बारा अभंगाला सोडूं नका ।।2।।
सोडू नका तुम्हा सागिंतले वर्म। भवपाशीं कर्मे चुकतील ।।३।।
चुकती यातायाती विठोबाची आण। करा हैं पठण जीवे भावें ।।4।।
जीवेंभावे करितां होईल दर्शन। प्रत्यक्ष सगुण तुका म्हणे ।।5।।
(15)
वेदाचे अभंग केले श्रुतिपर । द्वादश सहस्र संहितेचे ।।1।।
निघंट निरूक्त आणि ब्रह्मसूत्र । अवतार सहस्र उपग्रंथ।।2।।
अभंग हे कोटी भक्तिपर झाले। ज्ञानपर केले तितुकेचि । ।3।।
पंचाहतर लक्ष वैराग्य वर्णिले। नाम तें गाईलें तितुकेचि ।।4।।
साठ लक्ष केला बोध या जगासी। वर्णिलें रूपार्सी तितुकेंचि ।।5।।
तीस लक्ष केली देवासि करूणा। कर्मकाण्ड जाणा एक लक्ष ।।6।।
द्वादशसहस्र स्वात्मानुभवी एवं जाणा सर्व संख्या ऐशी ।।7।।
ऐसे हे अभंग झाले से भूतीं। पांच अंतराळी पत्रिकेचे । ।8।।
चौतीस सहस्र लक्ष एक कोटि पांच। साँगोनिया साच गेला तुका ।।9।।
(16)
सगुण हें ब्रह्म विठ्ठलचि बोले। ऐक पां वहिले तुकारामा ।।1।।
तुकाराम तुवां केले जे अभंग।
करिती जे कां जगीं नित्य पाठ ।।2।।
जगीं पाठ करितां आवडर्डी सद्भावें। विपत्ति न होये त्या प्राण्यासी ।।३।।
प्राण्याचे कल्याण होईल बा पाहे। भावें वाचितां हे नित्यनेमें ।।4।।
नेमे संकष्टासी करी अकरा पाठ। विध्न त्याचे स्पष्ट दूर होय । ।5।।
दूर होय विघ्न विठ्ठल म्हणें तुकया। शेवटी निजठायां नेईन मी ।।6।।
(17)
गुरूचरणी ठेविति भाव। आपेआप भेटे देव ।।1।।
म्हणुनी गुरूसी भजावें। रूप ध्यानासी आणावें ।।2।।
देव गुरूपार्शी आहे। बारंबार सांगू काये ।।३।।
तुका म्हणे गुरूभजनी। देव भेटे जनीं वनी ।।4।।
(18)
जयजय गुरूमहाराज गुरू (4 वेळा)
जय जय परब्रह्म सद्गुरू (1 वेळा)
गुरू जयगुरू ज जयगुरू ।। जयगुरू जयगुरु
जयगुरू जर जयगुरू जयगुरू जयगुरू ।।
(19)
सब संतन की जय । बालगोपाल की जय ।
तुकाराम महाराज की जय। ज्ञानोबा महाराज की जय।
रुक्मांगदमहाराज की जय। कृष्णद्वेपायन महाराज की जय ।
रामदास महाराज की जय। गुरूलिंग जंगम महाराज की जय।
रघुनाथ प्रियमहाराज की जय। श्री भाऊसाहेब महाराज की जय ।
श्री अंबुरावमहाराज की जय । श्री गुरूदेव रामभाऊ महाराज की जय ।
श्री गुरुदेव दाते साहेब महाराज की जय । श्री मातेश्वरी महाराज की जय।
श्री गुरूदेव दत्त दत्त दत्त ।
(20)
रामाश्रम सद्गुरूराज । गुरुलिंग जंगम महाराज ।। (2 वेळ) गुरूलिंग जंगम महाराज ।। (2 वेळ)
रामाश्रम सद्गुरुराज । गुरुलिंगजंगम महाराज ।। (2 वेळ) हिंचगेरीवासी सद्गुरुराज ।
उमदी भाऊसाहेब महाराज ।। (2 वेळ) उमदी भाऊसाहेब महाराज ।।
(2 वेळ) हिंचगेरीवासी सद्गुरुराज । उमदी भाऊसाहेब महा राज ।। (2 वेळ) हिंचगेरीवासी सद्गुरुराज । जिग-जीवणी
अंबुराव महाराज (2 वेळ) जिगजीवणी अंबुरावमहाराज ।। (2 वेळ)
हिंचगेरीवासी सद्गुरुराज । जिगजीवणी अंबुराव महाराज ।।
(2 वेळ) निंबाळवासी सद्गुरुराज। गुरूदेव रामभाऊ महाराज ।। (2वेळ)
गुरूदेव रामभाऊ महाराज ।। (2 वेळ) निंबाळवासी सद्गुरुराज । गुरूदेव रामभाऊमहाराज ।। (2 वेळ)
जोधपुवासी सद्गुरू राज। दाते साहेब महाराज (2 वेळ) दाते साहेब महाराज (2 वेळ)
जोधपुर वासी सद्गुरुराज । दाते साहेब महाराज ।। (2 वेळ)
जोधपुरवासी सद्गुरूमाय। मातेश्वरी महाराज (2 वेळ)
मातेश्वरी महाराज (2 वेळ)
जोधपुरवासी सद्गुरूमाय। मातेश्वरी महाराज (4 वेळ)
(21)
आकल्प आयुष्य व्हावें तया कुळा। माझिया सकळां हरिच्या दासां ।।1।।
कल्पनेची बाधा न हो कोणे काळी। ही संतमंडळी सुखी असो ।।2।।
अहंकाराचा वारा न लागो राजसा। माझ्या विष्णुदासा भाविकांसी ।।३।।
शरीरप्राणांसी करीन कुरवंडी क्षण एक न सोडी संग त्यांचा ।।4।।
नामा म्हणे तया असावें कल्याण। जया मुखीं निधान पांडुरंग ।।5।। विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ।
(22)
मी तंव अन्यायी अपराधी। कर्महीन मतिमंदबुद्धि ।।1।।
तुज म्यां आठविलें नाहीं कीं। वाचे कृपानिधि माय बापा।।2।।
नाहीं ऐकिलें गाइलें गीत। धरिली लाज सांडिले हित ।।३।।
नावडे पुराण बैसले संत। केली बहुत परनिंदा ।।4।।
केला नाहीं करविला नाहीं परोपकार। नाहीं दया आली पीडितां पर ।।5।। करूं
नये तो केला व्यापार। उत्तरी पार तुका म्हणे ।।6।।
ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम !
गुरुराया
गुरुराया । शरणागत तव पाया। येई ताराया।
अवधूता। चरणीं नत मी ताता । येई ताराया।।
श्रीदत्ता । अर्पित मी तुज चिता । येई ताराया।।
योगीशा। मागत मी उपदेशा। येई ताराया।।
आनंदा। निजानुभव दे मंदा। येई ताराया।।
सर्वज्ञा । सूज्ञ करी मझ अज्ञा। येई ताराया।
उन्मत्ता। हरवीं कलिची सत्ता। येई ताराया।।
ब्रह्मिष्ठा। याचित मी दृढनिष्ठा । येई ताराया ।।
श्रीपादा । दर्शन देई वरदा। येई ताराया।।
त्रिगुणेशा। तोडीं या भवपाशा । येई ताराया ।।
निःसंगा। भजनी दे अनुरागा। येई ताराया।।
निर्मुक्ता। मुक्त करीं पद सक्ता। येई ताराया।।
श्री रामभाऊ रानडे महाराजांची
आरती रामराया, स्मृर्तगामी समर्था ।
सच्चिदानन्द नाथा, परब्रह्म तत्वता ॥ आरती रामराया-१ संसार-दुःख हरो, अघनाश-कारका ।
मृत्युभय हरण करो, नाम-संजीवनी-दाता ॥ आरती रामराया-२ अखंड चरणसेवा, दर्शनसुख समाधि ।
याचना माझी इतुकी, पूर्ण करो दयाघन ॥ आरतो रामराया-३
भवाच्या भयें
भवाच्या भयें काय भीतोस लंडी । धरी रे मना धीर धाकासि सांडी ॥
रघुनायका सारिखां स्वामि शीरीं । नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥
समर्थाचिया सेवका वक्र पाहे। असा सर्व भूमंडली कोण आहे ॥
जयाचि लिला वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी कदा राम दासाभिमानी
उपासनेला दृढ़ चालवावें। भूदेव संतासी सदा नमावे ॥
सत्कर्म योगे वय घालावे। सर्वामुखी मंगल बोल आदे।।
जय जय रघुवीर समर्थ । राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.॥ए
रक्षः रक्षः परमेश्वरए परमेश्वरए महाराज सर्वांना सुखी ठेवा ।
आयुष्यए आरोग्यए सम्पतिए संततीए सर्व मनोरथ पूर्ण करा महाराज़ ।
जगदंब जगदंब जगत् जननी नारायणी जगन्न माते । सर्वांना सुखी ठेवा ॥
अरे गहनाचें ही गहन । ते तू जाध सद्गुरु वचन । सद्गुरु वचने समाधान नेमस्त आहे ॥
देव कृपेचा सागरुए देस करुणेचा जलधरूं । देवांसी भक्तांचा विसरूए पडणार नाहीं ॥
राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय ॥
रविवार आरती (दासबोधाची)
जय जयादासबोधा ग्रंथराजा प्रसिद्ध । आरती
ओवाळीन विमळज्ञान बाळबोधा । । ध्रु. । ।
वेदांतसंम तीचा काव्यसिंधु भरला । श्रुतिशास्त्रग्रंथगीता साक्ष
संगम केला। महानुभाव संतजनीं अनुभव चाखिला ।
अझान जडजीवा मार्ग सुगम झाला ।।1।। नवविधा
भक्तिपंथें रामरूप अनुभवी । चातुर्यनिधि मोठा
मायाचक्र उगवी । हरिहरहृदींचे गुह्य प्रकट दावी ।
शनिवार आरती रामदासांची
आरती रामदासा । सद्गुरु सर्वेशा । कायावाचामनोभावें । ओवाळूं परेशा ॥1॥
रामदास मूर्तिमंत । रामचंद्र अवतार । कलियुगीं अवतरोनी । केला भक्तांचा उद्धारं ॥2॥
वैराग्य भक्ति ज्ञान । शांति क्षमा विरक्ती। विवेक सालंकृत । क्षमा दया सर्व भूतीं ॥3॥
संच्चिदानंदघन । रामदास केवळ । दिनकरकृपायोगें । रामचंद्र निर्मळ ।।4।।
शुक्रवार आरती (देवी)
दुर्गे दुर्घटभारी तुजविण संसारीं । अनाथनाथे अंबे करूणा विस्तारी ॥
वारी वारी जन्ममरणातें वारी। द्वारी पडलों आतां संकट निवारी ॥1॥
जयदेवी जयदेवी जयमहिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वरवरदे तारकसंजीवनी । जयदेवी जयदेवी।। ध्रु.॥
त्रिभुवनीं भवानीं पाहतां तुजऐसी नाहीं। चारी श्रमलों परंतु न बोलवे कांहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाहीं। ते तूं भक्तालागीं पावसि लवलाहीं ॥2॥
प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा । क्लेशापासुनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचुनि कोण पुरविल आशा । नरहर तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥3॥
गुरुवार आरती (दत्त)
त्रिगुणात्मक त्रयमूर्जी दत्त हा जाणा।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ॥
नेति नेति शब्द नये अनुमाना।
सुरवर-मुनिजन-योगीं समाधिलें ध्याना ॥
जय देव जय देव जयश्री गुरुदत्ता ।
आरती ओवाळीतां हरिली भवचिंता ।।1।।
सबाहय अभ्यंतरीं तं एक दत्त ।
अभाग्यासी कैची कळे ही मात ।।
परा ही परतली तेथे कैचा हेत।
जन्ममरणाचा पुरलासे अंत ।। जय देव.।।2।।
दत्त येउनियां उभा ठाकला ।
साष्टांगें नमुनी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि त्यांनीं आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा बा फेरा वांचविला ॥ जय देव. ॥3॥
दत्त दत्त ऐसें लागलें ध्यान। हारपळे मन झाळे उन्मन ।
बुधवार आरती (ज्ञानेश्वर महाराजांची)
आरती ज्ञानराजा । महाकैवल्यतेजा । सेविती साधुसंत । मनु वेघला माझा ।। ध्रु०।।
लोपलें ज्ञान जगीं। हित नेणती कोणी । अवतार पांडुरंग । नाम ठेविलें ज्ञानी ।।1।।
कनकाचें ताट करीं। उभ्या गोपिका नारी । नारद तुंबर हो । सामगायनकारी ।।2।।
प्रकट गुह्म बोले । विश्व ब्रह्मचि केलें । एका जनार्दनीं। पायर्यो टकचिं ठेलें ॥3॥
मंगलवार की आरती (गणपति)
सुखहर्ता दुखहर्ता वार्ता विध्नांची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची।
सर्वागीं सुदर उटि शेंदूराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥1॥
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ति ।
दर्शनमात्रे मनकामनापूर्ति ॥
जयदेव जयदेदे ।। ध्रु०।।
रत्नखचितफरा तुज गौरीकुमारा
चंदनाची उटि कुंकुमकेशरा ।।
हिरेजडित मुगुट शोभतो बरा ।
रुणझुणती नुपुरें चरणी घागरिया ।।2।।
सोमवार की आरती
लवथवती विक्राला नरमुण्ड माळा । विर्षे कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाला ॥
लावण्यसुदर मस्तकीं बाळा । तेथुनियां जळ निर्मख वाहे झुळझुळां ॥1॥
जय देव जयदेव जय श्रीशंकरा । आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ध्
कपुर्रगौरा भोळा नयनीं विशाळा । अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ।।
विभुतीचें उधळण शितिकंठनीळा । ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥2॥
देवीं-दैत्यीं सागरमंथन पै केळें । त्यामाजीं अवचित हळहळ जें उठिलें ।॥
तें त्वां आनंदे प्राशन केलें । नीळकठं नाम प्रसिद्ध झालें ॥3॥
व्याघ्रांबरफणिवरधर सुंदर मदनारी। पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी। रघुकुलांतिलकराम दासा अंतरी ॥4॥
पंचप्राणवेंबुव आरती माडीन्हा। पंचतत्वबेंब
वत्ति हच्चिरि चंचलवृतिर्येब घृतवन्हाकीरी ।
पंचकर्मेद्रियगळ दहन माडीरि ।।1।। जयदेव जयदेव
जयपरमहंसा, गुरूपरमहंसा। दयामाडिदय्या नी एनगे
सर्वेशा। जयदेव जय ।। ध्रु. ।। आदर परसि आरू
चक्रा मीरिसिदि। वेदके निलुकद निजगुणरत्ना
तोरिसिदि ।। आदिनाथनल्लि लक्ष्यविडिसीदि। नादद
मूल ॐ कारदोळु बेरिसीदि ।। जयदेव जयदेव ।।2।।
तंदेत्रिमल्ल नी सद्गुरूनाथा। कंदगे ज्ञानद वस्तु
कोट्टथा दाता।। संदेह बिडिसि एनगे माडिदि
प्रख्याता। छंददि भजिसुवे ना निनगे अबधूता ।।3।।
जयदेव जयदेव ।।
श्री विनायकराव दाते महाराजांची आस्ती
आरती दाते राया। सद्गुरु कृपा निकेता।
त्रिताप भव त्राता । ब्रह्मानन्द स्वरूपा ।। आरती. ।।
अजस्त्र नाम निष्ठा। गुणत्रय देहातीता।
कारुण्यामृत स्रोता। शांतिक्षमा परिपूर्ता ।। आरती. ।।
कृपालु दीनानाथा। भक्तिदान देओ दाता।
त्रिभुवन गुण गाता। नररूप भगवंता ।। आरती. ।।
रामभाऊ रानडेमहाराजांची
आरती रामराया, स्मर्तृगामी समर्था ।
सच्चिदानंद नाथा, परब्रह्म तत्वता ।। ध्रु ।।
संसार दुःख हरो, अधनाशकारका।
मृत्युभय हरण करो, नाम-संजीवनी दाता ।।1।।
अखंड चरणसेवा, दर्शनसुख समाधि ।
याचना माझी इतुकी, पूर्ण करा दयाधना ।।211
श्री अंबुराव महाराजांची आरती
आरती अंबुरावांची। माझ्या सद्गुरूरायांची।
वंदुनि भाऊराव चरण। अहर्निशीं होति ध्यानमग्न।
असुनि सद्गुणांचि खाणी। जपतीबहू यमऽनियर्मी । चाल।
अवगणुनि पंचभूतातें। मनबुद्धि-अहंकाराते।
साधि जो त्वरित, ध्यान अविरत, नित्य जागरत,
समाधि आत्मस्वरूपाची, देहातीत ब्रह्मरूपाची ।। आरती…
नाशुनि रजतमोराशी। वाढविलें सत्य-चांदण्यासी ।
पाजुनि नाममंत्रासी । दाविलें ब्रह्मतेजासी । चाल ।
सर्वाभूति आत्मभावानें। भक्तावरिल गाढ प्रेमाने ।
जो करी पावन, दुःखनिवारण, पाप-विमोचन,
वाढवी भक्ति साधकांची, श्रद्धायुक्त गुरुपुत्रांची ।। आरती….
भाऊ साहेब महाराजांची
मंगल महालिंग उमदीशा। मुनिजन पोषा।
भासउपाधीतीत सर्वेशा। इंचगेरिवासा ।। धृ.।।
पृथ्विमेलिन प्रेमभक्तरनु । परिपालिसुव । नित्यनित्यदि
सत्य शंकरने।। चितशुद्धि माडु एन्न कर्तृ निन्न करूण
विटटू। मृत्युविन बाघेयनु बिडिसुव सत्य सद्गुरू काड सिद्धा ।।1।।
धरणिपालिप दुरितसंहरने । त्रिपुरांतकने ।
चरणसेवक भजकरक्षकने। मायावि नीने परमपावन पंचपाशकने।
मोरेय होक्कर बिरदु कायुव अरवु कोट्टु मरवु बिडिसुव। शरणजनस्मरणि
तारक सुंदरात्मक सगुणनिधिये ।।2।। अष्टदिक्पालकर ओडेयने ।
सृष्टिकर्ता । श्रेष्ठ सद्गुरू लिंगजंगमने ।। निष्ठेयिंदलि नंबिदवर कष्ट
कडिदु कडेय हापिसुव। वृष्टि अमृत सुरिदु जगदि जय जय पडेदंथ सद्गुरू ।।३।।
आरती करा हो सज्जन । द्वैतभाव टाकून ।। ध्रू ।।
विवेक सद्बुद्धि । सद्बुद्धि। लक्ष लावुनी पदीं।
अंतःकरण। मनशुद्धि । द्वैतातीत बुद्धि ।।1।।
इडा पिंगळा। सुषुम्ना। मार्ग आहे कठीण।
त्रिकूटसंगम । समर्चन। महालिंगदर्शन ||2||
चिन्मय गुरूमूर्ति। गुरूमूर्ति । अणुरेणू भासती ।
बुद्धि भासाची । गुरूपुत्र जाणती ।।३।।
हे भगवन्, तुम्हारा विस्मरण कभी नहीं हो यही दान मुझे दो।
तुम्हारे गुणगान प्रेम से करना यही मेरा सर्वस्व है। मुझे मुक्ति,
धन या संपदा कुछ नहीं चाहिये, मुझे तो सदैव संतसंग दो।
तुकाराम कहते है, यह देते हुए चाहे तुम मुझे (अनेक बार)
गर्भवास दे देना ।
हेंचि दान देगा देवा। तुझा विसर न व्हावा ।।
गुण गाईन आवडी। हेंचि माझी सर्व जोड़ी ।।
नलगे मुक्ति धन संपदा। संतसंग देई सदा ।।
तुका म्हणे गर्भवासी। सुखे घालावे आम्हांसी ।।
(1)
नारायण, नारायण, नारायण, नारायण ।।
बेळगायितु, बेळगायुित, बेळगायितु, बेळगायितु ।।
एळु नारायणा एळु लक्ष्मीरमणा एळु श्रीगिरिवास
श्री व्यकंटेसा पल्ला कासिद हालुगळु कावडियल्लि
तु बि लेसागि हाल्मोसरूबेण्णेयनु कडेदु । शेषशयने एळु
समुद्रमथनव माडु देश केंपायितु एळु हरिये ।।1।।
अरळुमल्लिगिजाजि परिमळद पुष्पवनु सुररू तंदिट्टारे सुजनरेल्ला ।
अरविंदलोचना श्रीगोपाल कृष्णा एळय्या एळु निनगेष्टु निद्रा ||2||
दासरेल्लरू बंदु धूळिदर्शन गोंडु लेसागि ताळदंडिगे पिड्डिदु ।
आदिकेशव निम्न पुण्यनामस्मरणि उदयदल्लेदु पाडुतिर्परू हरिये ।।३।।
(2)
शरणु सिद्धिविनायका शरणु विद्याप्रदायका
शरणु पार्वतितनयमूरूति शरणु मूषकवाहन ।। पल्ल ।।
निटिलनेत्रन वरदपुत्रने नागभूषणप्रियने ।
कटिकरांकितकोमलांगने कनककुंडलधारने ।।1।।
बट्टुमुतिन पदकधारने बाहुहस्तचतुष्टने ।
इट्ट तोलदि हेमकंकण पाशांकुशधारने ।।2।।
कुक्षिमहालंबोदर ने इक्षुचापन गेलिदने ।
पक्षिवाहननाद पुरंदरविठ्ठलन निजदासने ।।3।।
नारायण, नारायण, नारायण, नारायण ।।
(3)
उठोनिया प्रातःकाळी। वेगें जाऊं राउळासी ।
जळतिल पातकांच्या राशी। काकडआरती देखिल्या ।।1।।
उठा उठा हो साधुजन । साधा आपुलाले हित।
गेला गेला नरदेह। मगकैचा भगवंत ।।2।।
उठोनिया पहाटे। विठोबा पाहूं बा नीट।
चरणतयाचे अमोलिक। अवलोकूं दृष्टर्टी या ।।३।।
जागे करा रुक्मिणीवरा । देव निजले निजमंदिरां ।
वेगी निंबलोण करा। दृष्ट होईल तयासी ।।4।।
ढोल दमामें गर्जतीं। पुढ़ें वाजंत्री वाजती ।
काकडआरती होते। पांडुरंगरायाची ।।5।।
सिंहशंखनाद भेरी। गजर होतो महाद्वारी ।
केशवराज विटेवरी। नामा चरणी वंदितो ।।6।।
(4)
गुरु हा संतकुळीचा राजा। गुरु हा प्राणविसांवा माझा ।
गुरुविण देव नाहीं दुजा। पाहतां त्रिलोंकी ।।1।।
गुरु हा सुखाचा सागर। गुरू हा प्रेमाचा आगर ।
गुरू हा धैर्याचा डोंगर । कदाकाळी डळमळेना ।12।।
गुरु हा सत्यालार्गी साह्य। गुरू हा साधकासी माय ।
गुरू हा कामधेनु गाय। भक्ताघरी दुभतसे ।।३।।
गुरू हा भक्तीचें मंडण। गुरु हा देहासी दंडण ।
गुरू हा पापा चें खंडण । नानापरी वारितसे ।।4।।
गुरु हा वैराग्याचें मूळ । गुरू हा परब्रह्म केवल ।
गुरु हा सोडवी तात्काल । गांठी लिंगदेहाच्या ।।5।।
गुरू हा घाली ज्ञानांजन । गुरू हा दाखवी निजधन ।
गुरू हा सौभाग्य देऊन । स्वात्मबोध नांदवी ।।6।।
काया काशी गुरू उपदेशी । तारक मंत्र दिला आम्हांसी ।
बापरखुमादेबीवरासी । ध्यान मानसी लागलें ।।7।।
(5)
फळलें भाग्य माझे । धन्य झालो संसारी ।
सद्गुरू भेटले हो। त्यानी धरियेले करी ।
पश्चिमे चालवीलें। आत्मा तेथे निर्धारी ।
त्रिकुटावरी नांदे । देखियेली पंढरी ।।1।।
तें सुख काय सांगू । वाचें बोलतां नये ।
आरतीचेनि योगें। गेळें मीपण माये ।। ध्रू. ।।
राउळामार्जी जातां। राहे देह अवस्था।
मन हैं उन्मन झालें। नसे बद्धतेची वार्ता।
हेतु हा माळवळा। शब्दा आली निःशब्दता ।
तटस्थ होउनि ठेलें। निजरूप पाहतां ।।2।।
त्रिगुण गुण बाई। पूर्ण उजळल्या वाती ।
नवलाव अविनाश। न जाये स्वयंज्योती।
लावितां लक्ष तेथे। हालूं विसरली पाती ।
नातुडे मन माझे। न कळें दिवसरातो ।।३।।
आरती विठ्ठलाची। पूर्ण उजळली अंतरीं।
प्रकाश थोर झाला। सांठवेना अंबरी ।
रविशशि मावळले। तया तेजामाझारी।
बाजती दिव्य वाचें। अनुहत गजरी ।।4।।
आनंदसागरांत। प्रेमें बुढी दिधली ।
लाधर्ले सौख्य मोठे। नये बोलतां बोलीं। सद्गुरूचेनि संगे।
ऐसी आरती केली।
निवृत्ति आनंदांत। तेथे वृत्ति निमाली ।।5।।
विठ्ठल, विठ्ठठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल ।
पुंडलीक वरदा हरि विठ्ठल ।
याचेऽहं करूणासिन्धो यावज्जीवमिदं तव
अदैन्यं देहदाढर्यं च त्वत्पादाम्बुजसद्रतिम् ।।
अनाद्यनन्तकालेषु भृत्योऽहं त्वं हि मे प्रभुः ।
त्वं तुष्टो वाऽथ रुष्टो वा तवां विना मे गतिर्नहि ।।
तुष्टोऽसि त्वं दयासिन्धो किमन्यैर्मम रक्षणे ।
रुष्टोऽसि त्वं दयासिन्धो किमन्यैर्मम रक्षणे ।।
दोषाणां च सहिष्णुत्वे त्वत्समो नास्ति भूतले ।
मत्समो नहि देवेश कृतघ्नो वंचकोऽपि वा ।।
ईशस्याखिलवीर्यस्य किमसाध्यं वदाच्युत ।
ममेष्टं च कियन्मात्रं किमेतावद्विलम्बनम् ।।
जगत्स्वामी कृपापूर्णः सम्भवेन्निर्दयापरः ।
का तदा गतिरस्माक गरदायां स्वमातरि ।।
त्वमेवैको जगत्त्राता दाता ज्ञाता दयान्वितः ।
त्वां विना कः पुमान्कर्ता ह्यस्माकं तु मनोरथम् ।
आर्तबन्धुरिति ज्ञात्वा त्वामहं शरणं गतः।
रक्षमामथवा सम्यक् त्वं यशो मुंच शाश्वतम् ।।
दीनबन्धो दयासिन्धो सुहृत्बन्धो जगत्पते ।
संसारार्णवमग्नं मां कारूण्येश ममुद्धर ।।
निर्गुणेष्वपि सर्वेषु दयां कुर्वन्ति साधवः ।
नहि संहरते ज्योत्स्नां चन्द्रश्चाण्डालवेश्मनि ।।
प्रसीद मे श्रियः कान्त सुप्रसीद दयानिधे ।
पुनः पुनः प्रसीद त्वं प्रसीद वरदो भव ।।
तापत्रये हा बहु गांजलोमी । बुद्धि स्थरावे नच शीघ्र रामी ।।
मने वोदिलो सर्वदा काम पाशी। गुरो कृपालू धरि शीघ्र हाती ।।1।।
विपत्ति असो सर्वदा कुंति मागे। हरीचे जरी सर्वदा ध्यान लागे।।
सुटेना कदा भोगल्याविण भोग। परी सर्वदा नाम इच्छी अभंग | 1211
मनी प्रेरणा थोर आता करावी। सदा वस्तु ने दृष्टि माझी भरावी ।।
शरीरी सदा नेम हा वाढवावा । सदा बुद्धिला ज्ञान योगीच ठेवा ।।३।।
सदा संतसंगी रमो चित्त माझे।
सदा तत्पदी वास माझा असोदे ।।
कर्धी दाविसी आमुची पंढरी ही।
भरे मानसी सर्वदा इंचगेरी ।।4।।
संसार तापे बहु तापलो पहा।
निवृत्ति मार्गे मज शीघ्र चालवा ।।
नसे रक्षिता दूसरा कौण माते।
कृपा पूर्ण दासानुदासा असो दे ।।5।।
(1)
नारायण, नारायण, नारायण, नारायण ।।
प्रभात हो गया, प्रभात हो गया।
हे प्रभो, नारायण, लक्ष्मीरमण, श्री गिरीवासी व्यंकटेश जागो।
धारोष्ण दूध की चरवी भरी हुई है। दूध और दही को मथकर
उत्तम प्रकार से मक्खन है। हे शेषशायी श्रीहरे, पूर्वदिशा आरक्त
हो गई है। सत्वर उठकर समुद्रमंथन करो ।।1।।
मोगरा, जाई, जुई आदि प्रफुल्लित सुमन सुर सज्जन लाये है।
अरविन्दलोचन, श्रीगोपाल कृष्ण, जागो, उठो, कब तक सोओगे ।।2।।
तुम्हारे सब भक्त आ गये है। उन्होंने तुम्हारी पदरज का
बंदन किया है। प्रातः काल उठकर हाथ में टाळ और वीणा
लेकर, हे आदिकेशव श्री हरे, ये तुम्हारे पुण्यपावन नाम का संकीर्तन
कर रहे है।।3।।
(2)
है सिद्धिविनायक, विद्याप्रदायक, पार्वतीतनय मूषकवाहन, तुम्हारी शरण हूं ।। ध्रू.।।
हे भालनेत्र और नागभूषण शंकर के प्रिय वरद पुत्र, तुम्हारा अंग
कोमल है, तुमने कटिपर हाथ रखा है और कान में कनककुण्डल धारण किये हैं ।। 1 ।।
हे चतुर्बाहो, (गले में) तुमने बड़े-बड़े मोतियों का पदक
धारण किया है, हाथ में स्वर्ण-कंकण, पाश और अंकुश धारण किया है ।।2।।
हे महाकुक्ष, लम्बोदर, तुमने कामको जीत लिया है, गरूडवाहन (विष्णु) का भक्त पुरन्दरविठ्ठल तुम्हारा दास होकर वंदन करता है।।3।।
नारायण, नारायण, नारायण, नारायण ।।
(3)
प्रातः काल में उठकर शीघ्घ्र ही मंदिर चलिये, वहाँ काकड आरती देखने से पातकों की राशियां जल जायेगी | |1| |
हे साधुजन, उठो-उठो, अपना हित साधलो, नरदेह जा रहा
है, पश्चात् भगवान कैसे मिलेंगे? | | 2 | |
सूर्योदय से पहले उठकर विठ्ठल को भली प्रकार देख लें, (विशेषतः) उनके अमोलिक चरण नयनभर देख लें ।।3।।
रुक्मिणीवर ईश्वर निज मंदिर में सोये है, उनको जगाओ : उन पर सत्वर न्यौछावर करो, कहीं किसी की दृष्टि न लग जाय | |4 | |
पाडुरंगराय की काकड़-आरती हो रही है, उनके सामने ढोलदुंदुभि तथा वाजंत्रीका गर्जन हो रहा है ।।5।।
महाद्वार में सिंह-शंख-भेरियों के (समान) नाद हो रहे है। केशवराज ईटपर (खड़े) हैं, और नामदेव उनके चरणों पर वंदन करता है | |6 | |
(4)
गुरू संतकुलका राजा है, गुरू प्राणों की विश्रांति है, त्रैलोक्य में देखें तो भी गुरू के सिवाय दूसरा देव कोई नहीं मिलेगा ।।1।।
गुरू सुख का सागर है, गुरू प्रेम का सागर है, गुरू धैर्य का अचल पर्वत है।।2।।
गुरू सत्य के लिये सहायक होता है, गुरू साधकों की माता है, गुरू भक्तों के घर में दूध देने वाली काम धेनु है ।।3 | |
गुरू भक्ति का भूषण है, गुरू (साधन के लिये) देह से कष्ट करवाता है, गुरू पापों का खंडन करके हर प्रकार से (भक्तों का) रक्षण करता है।।4।।
गुरू वैराग्य का मूल है, गुरू केवल परब्रह्म है, गुरू लिंगदेह की ग्रन्थि तत्काल खोल देता है। ।5।।
गुरू (नेत्रों में) ज्ञानांजन डालता है, गुरू निजधन बताता है, गुरू सौभाग्य देकर स्वात्मबोध का रक्षण करता है | |6 | |
इस कायारूपी काशी क्षेत्र में हमको गुरू ने तारक मंत्र दिया बापरखुमादेवीवर (ज्ञानदेव) कहते हैं कि हमारा मन ध्यान में लग गया | |7 | |
(5)
सद्भागय का फल मैंने पाया, मैं संसार में धन्य हो गया। सद्गुरू मिल गये, उन्होंने (मुझे) हाथ से धर लिया और पश्चिम मार्ग से लेजाकर त्रिकुटि में आत्मा का निर्धार करवाया, वहां मैंने पंढरी देखली ।।1।।
वह सुख मैं कैसे कहूं; वाणी में नहीं आता है। आरती करने से मेरा अहंभाव चला गया ।। ध्रु. ।|
मंदिर में आते ही देहभाव लुप्त हुआ, मन उन्मन हो गया, बद्धता का नाम ही नहीं रहा। वासना अस्त हुई। शब्द कुंठित होने से (साधन की) निःशब्दावस्था आ गई। निजरूप देखते ही (चित्त) तटस्थ हो गया । ।2।।
हे मुक्ताबाई, तीन गुणों की बत्ती प्रज्वलित हो गई, किन्तु आश्चर्य यह है कि (इसके साथ) स्वयं ज्योति का नाश नहीं होता। उस पर लक्ष देते ही पलक हिलना भी विसर गये और मन वहाँ से अलग ही नहीं होता, दिनरात का पता नहीं चलता है।।3।।
विठ्ठल की आरती से मेरे अंतर में पूर्णतया उजाला हो गया, (बाहर भी) वह प्रकाश इतना बढ़ा कि आकाश में भी नहीं समाया, उस तेज में सूर्य-चन्द्र के तेज का लोप हो गया। उसी समय अनेक दिव्य वाद्यों के अनाहत बजने का घोष हो गया | |4 | |
ब्रह्मानन्द सागर में प्रेम से मग्न हो गया। महान् सुख प्राप्त हुआ, वह वाणी से कहने में नहीं आता है। सद्गुरू के साथ ऐसी आरती की। निवृत्तिनाथ कहते हैं कि वृत्ति आनंद में विलीन हो गई ।।5।।
विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल ।
पुंडलीक वरदा हरि विठ्ठल ।
हे करूणासिन्धो (दयानिधान)! मैं जीवन पर्यन्त आपके अभीष्ट, अदीनमाव, देह की दृढ़ता तथा आपके चरण कमलों में श्रेष्ठ रति के लिये याचना करता हूँ।
मैं अनादि (Beginningless) तथा अनन्त (Infinite) कालों में आपका भृत्य (सेवक, दास) रहा हूँ। आप मेरे प्रभु (स्वामी) है। आप चाहे तुष्ट (प्रसन्न) हो अथवा रुष्ट (क्रुद्ध), आपके बिना मेरी गति (शरण) नहीं है।
हे दयासिन्धो (करूणानिधान)! आप मुझ पर प्रसन्न (तुष्ट) है, अतः मेरी रक्षा के लिये अन्यों से क्या प्रयोजन? दयासिन्धो! यदि आप मुझ पर रूष्ट (क्रुद्ध) है, तो भी मेरी रक्षा के लिये अन्यों से क्या प्रयोजन?
इस भूतल पर दोषों के प्रति सहिष्णुता में आपके समान कोई नहीं है। हे देवेश (भाग्य के अधिष्ठाता)! मेरे समान कृतघ्न (अकृतज्ञ, Ungrateful) तथा ठग भी कोई नहीं है।
हे अच्युत (च्युतिरहित, अनश्वर)! यह बतावें, समस्त शक्तियों से सम्पन्न ईश के लिये क्या असाध्य है? मेरा अभीष्ट (Desire) कितना सा है? उसकी पूर्ति में इतना विलम्ब क्यों?
यदि कृपायुक्त जगत्स्वामी के भी निर्दय होने की सम्भावना हो, तो निज माता के द्वारा विष प्रदान करने पर हमारी क्या गति होगी?
एक आप ही जगत के रक्षक, दाता, ज्ञाता और दयायुक्त हैं। आपके बिना कौन व्यक्ति हमारे मनोरथ को पूर्ण करने वाला है?
“आप पीड़ित के बन्धु हैं” यह जान कर मैं आपकी शरण में आया हूँ। आप मेरी अच्छी तरह से रक्षा करें अथवा अपने शाश्वत यश को (कि आप शरणागतों की रक्षा करते हैं) हमेशा के लिए त्याग दें।
हे दीनबन्धों, दयासिन्धो, उत्तमहृदय वाले बन्धो, जगत के स्वामी तथा करुणानिधान! संसार रूपी सागर में मुझ डूबे हुए का उद्धार करें।
साधुजन सभी निर्गुण (गुणहीन) व्यक्तियों के प्रति भी दया करते हैं। चन्द्रमा चाण्डाल के घर में भी अपनी चांदनी (चन्द्रिका) को समेटता नहीं है।
हे लक्ष्मीपते, दयानिधान! मेरे प्रति प्रसन्न होवें। आप पुनः पुनः प्रसन्न होवें और वरप्रदायक होवें।
अरे गहनाचें ही गहना । ते तु जाण सद्गुरु वचन । सद्गुरु वचने समाधान द्य नेमस्त आहे ॥
देव कृपेचा सागर । देव करुणेचा जलधरूं । देवांसी भक्तांचा विसरू । पडणार नाहीं॥ राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय ॥
आतां स्वामी सुखें निद्रा करा अवधूता। नरसिंह सरस्वति अवधूता। चिन्मयसुखधार्मी जाउनि पहुडा एकांता ।। ध्रू. ।।
वैराग्याचा कुंचा घेउनि चौक झाडिला। तयावरी सप्रेमाचा शिडकावा केला ।।1।।
पायघड्या घातल्या सुंदर नवविधा भक्ति ।।2।। ज्ञानाच्या समया उजळुनि लाविल्या ज्योती ।।2।।
भावार्थाचा मंचक हृदयाकाशीं टांगिला । मनाचीं सूमने जोडुनि केलें शेजेला ।।3।।
द्वैताचें कपाट लावुनि एकत्र केलें। दुर्बुद्धीच्या गांठी सोडुनि पडदे सोडिले ।।4।।
आशा तृष्णा कल्पनांचा सांडुनिगलबला ।। क्षमा-दया शांति दासी उभ्या सेवेला ।।5।।
अलक्ष्य लक्षुनी उन्मनी धेउनि नाजुक दुशेला । निरंजनी सद्गुरू माझा निर्जी निजेला ।।3।।
सुखसहिता दुःखरहिता निर्मळ एकांता ।
कलिमलदहना गहना स्वामी समर्था ।।
न कळे ब्रह्मादिकां अन्त अनंता ।
तो तूं आम्हां सुलभ जय कृपावंता ।।1।।
जयदेव जयदेव जय करूणाकर देव,
आपका करूणाकरा। आरती ओवाळू
सद्गुरुमाहेरा ।। ध्रु. ।। सद्गुरु
मायेविण माहेर विश्रांतीठाव।
शब्दी अर्थलाभ बोलणें वाव ।।
सद्गुरुप्रसाद सुलभ उपाव ।
रार्मी रामदासा फळला सद्भाव ।।2।।
जो जो जो जो रे, सुकुमारा, दत्तात्रय अवतारा, निद्रा करि आतां, उदारा, अद्भुत वरदातारा ।। जो जो।
कमलासन विष्णु त्रिपुरारी अत्री मुनीचे घरी सत्व हरूं वाली नवल परि ब्रह्म दवडिला दूरी ।। जो जो ।।
प्रसन्न त्रयमूर्ति होऊनी पुत्रस्तावा पाहूनी हर्ष झाला ते त्रिभुवनी गाते ऋषीचे सदनी ।। जो जो ।।
पालक बांधियला सायासी निर्गुण ऋषिचे वंशी पुत्र जन्मला अविनाशी अनुसूयेचे कूशी ।। जो जो ।।
षडरिपुनासारी आधार दत्तात्रय अवतार कृष्णदासासी सुख थोर आनंद हो तो फार ।। जो जो ।।
निजसुख पाळणा, पाळणा, हालविते मी कृष्णा, क्षणभरि करि शयना, लागो दे तुज नयना।। ध्रु. ।।
चंदनकाष्ठाचा, काष्ठाचा रंगित नवरंगाचा। जडित रत्नांचा, रत्नांचा वर चेंडु मोत्यांचा । ।। ।।
कळस सोन्याचा, सोन्याचा चौकोनी रूप्याचा। साखळदं डाचा दंडाचा, मंजुळ शब्द सुखाचा ।। 2।।
दोरी निजहाती, निजहातीं, तुजला गाती गीतीं। सखया हालविती, हालविती, घे बाळा विश्रांति ।।3।।
ऐसा ब्रजबाळा, ब्रजबाळा, हालविती गोपाळा। त्रिंबक प्रभुलिला, प्रभुलिला, वर्णित वेळोवेळां ।।4।।
जो जो जो जो रे श्रीरामा। निजसुखगुण विश्रामा ।।धृ।।
ध्याती मुनियोगी तुजलागीं। कौसल्याबोसगी ।।1।।
वेदशास्त्रींची मति जाण। स्वरूपिं झाली लीन ।।2।।
चारी मुक्तीचां विचार। चरणीं पाहती थोर ।।३।।
भोळा शंकर निशिदिनीं। तुजला जपतो मनीं ।।4।।
दास गात से पालणा। रामलक्षुमणा । ।5।।
(एकादशीस म्हणणेचा)
कृष्णा धांव बा लवकरी, संकट पड़लें भारी, हरी तूं आमुचा कैवारी, आलें विघ्न निवारी ।। ध्रु.।
पांडव असतां, वनवासी, कळलें कौरवांसी, त्यांनीं पाठविले, ते ऋषी, सत्व हरायासी ।।1।।
रात्र झाली से, दोनप्रहर, आले ऋषीश्वर । भोजन मागती, सत्वर, करूं कैसा विचार ।।2।।
साठी सहस्त्र, खंडी अन्न, दुर्वासा भोजन । सत्व जातील, घेऊन, अंतर पडतां जाण ।।३।।
आजि निष्ठुर कां, झालासी, कोठे गुंतलासी, माझी होईल बा गत कैशी, अनाथ मी परदेशी ।।4।।
कंठ शोषला, अनंता, प्राण जाईल आता, पदर पसरीते तुज आतां, पाव रूक्मंणी कांता ।।5।।
आतां न लावी उशीर, धर्म चिंतातुर, अनर्थ करील, तो फार, एवढा करी उपकार ।।6।।
ऐकुनि बहिणीची, करूणा, आला यादवराणा, द्रौपदी लीळतसे हरिचरणा, उद्धवचिद्धन जाणा ।।7।।
काकड आरती
॥ श्री राम ॥
सद्गुरु भाऊसाहेब महाराज को श्रीराम भाऊ महाराज द्वारा की गई प्रार्थना
जय जयादासबोधा ग्रंथराजा प्रसिद्ध । आरती ओवाळीन विमळज्ञान बाळबोधा । । ध्रु. । ।
वेदांतसंम तीचा काव्यसिंधु भरला । श्रुतिशास्त्रग्रंथगीता साक्ष संगम केला।
महानुभाव संतजनीं अनुभव चाखिला । अझान जडजीवा मार्ग सुगम झाला । ।। ।।
नवविधा भक्तिपंथें रामरूप अनुभवी । चातुर्यनिधि मोठा मायाचक्र उगवी । हरिहरहृदींचे गुह्य प्रकट दावी ।